rajaram sahakari sakhar karkhana kolhapur, Satej Patil, Saam Tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election : 'त्या' सभासदांनाही त्यांनी टाेपी घातली, सतेज पाटलांचा महादेव महाडिकांना टाेला (पाहा व्हिडीओ)

आगामी काळात राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हाेणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : आम्हांला टाेपी घालायला ज्यांनी यांना सभासद केले त्यांना देखील यांनी टाेपी घातली असा टाेला आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी ज्येष्ठ नेते महादेव महाडिक (dhananjay mahadik) यांना लगावला आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी (rajaram sahakari sakhar karkhana election update) निमित्त आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन करण्यात आले. (Breaking Marathi News)

कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष केंद्रित करणाऱ्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे. ही निवडणूक 23 एप्रिलला आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध काँग्रेसचे आमदार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पॅनल या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत.

आज सतेज पाटील यांनी आपल्या पॅनलच्या उमेदवारांचा अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केले. हा अर्ज दाखल करताना सतेज पाटील यांची राज्यभर गाजलेली टॅगलाईन पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. ती टॅगलाईन म्हणजे 'आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा...

सतेज पाटील म्हणाले कोल्हापुरातील महाडिक कंपनीने सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान केलेलं आहे. आम्ही राजाराम साखर कारखान्यासाठी गेली बारा वर्षे लढा देत आहोत. आता 'आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा' असा एल्गार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT