Satbara Utara online Process Step By Step : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी सातबारा उतारा लागतो. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी असो अथवा जमिनीचा वाद असेल त्यावेळी.. सातबारा उतारा लागतोच. पण सातबारा काढण्यासाठी तालुक्याला असलेल्या तहसील कार्यालयत सारख्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे वेळ तर जातोच, त्याशिवाय पैसाही खर्च होतो. पण सरकारकडून आता शेतकऱ्यांसाठी सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून दिलाय. त्यासाठी खर्चही अवघे १५ रूपये होतात. घरबसल्या फक्त १५ रूपयात सातबारा (how to download digital Satbara) उतारा काढता येतो. पण त्यासाठी नेमकी प्रोसस काय आहे? हे अनेकदा माहिती नसते.. हीच प्रोसेस आपण सोप्या शब्दात समजून घेऊयात..
सातबारा उतारा महत्त्वाचा का? How to get satbara utara online?
सातबारा हा शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्वाचा पुरावा असतो. यात जमिनीचं क्षेत्रफळ, पीकपेरा आणि इतर महत्त्वाची माहिती या उताऱ्यावर असते. याचा वापर तुम्हाला जमिनीचा व्यवहार करताना, कर्जासाठी आणि सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. त्यामुळेच सातबारा प्रत्येक शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरतो. 7/12 उतारा हा महसूल विभागाकडून जारी केला, तो तुमच्या जमिनीचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. (How can I check my name 7/12 Utara online in Maharashtra?)
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाभूलेख या पोर्टलवरून 7/12 उतारा ऑनलाईन पाहणं आणि डाउनलोड करणं खूप सोपं झालं आहे. यासाठी तुम्हाला जमिनीचा जिल्हा, तालुका, गाव आणि सर्व्हे नंबर किंवा गट नंबर माहित असालया हवा. तसेच तुम्ही https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेला सातबारा आणि आठ अ सर्व शासकीय कामांसाठी वैध कागदपत्र म्हणून मान्य असेल. तर यासाठी तुमच्याकडून १५ रुपये शुल्क आकारले जातील.
स्टेप 1
सर्वप्रथम Digital Satbara Portal ही वेबसाईट उघडा.
स्टेप 2
आता नवीन नोंदणी (Registration) करा. त्यामध्ये New User Registration वर क्लिक करा. त्यात नाव, मोबाईल नंबर, ई-मे आयडी भरा. मग तुम्हाला User ID आणि Password तयार करावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून नोंदणी पूर्ण करा.
स्टेप 3
पुढे तुम्हाला User ID आणि Password च्या मदतीने लॉगिन करावे लागेल. किंवा ओटीपी टाकावा लागेल.
स्टेप 4
आता तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी पोर्टलवर Wallet मध्ये १५ रुपयांची फी जमा करावी लागेल. हे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करा.
स्टेप 5
पुढे लॉगिन झाल्यानंतर Digitally Signed 7/12 हा पर्याय निवडा आणि डाउनलोड वर क्लिक करा.
स्टेप 6
तुम्हाला पुढे जमिनीची माहिती भरावी लागेल. त्यानंतर सर्च वर क्लिक करून स्क्रीनवर संबंधित जमिनीचा सातबारा उतारा दिसेल. त्यामध्ये माहिती तपासून घ्या.
स्टेप 7
आता डाउनलोड बटणावर क्लिक करा. तुमची फी कट होईल आणि तुम्हाला पीडीएफमध्ये सातबारा डाउनलोड होईल. त्यामध्ये डिजीटल सही, क्यूआर कोड, वेरिफिकेशन नंबर असतो. त्याने पुराव्याची पडताळणी करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.