SATARA SHOCKER: MIGRANT WORKER DIES BY SUICIDE IN WAI MIDC FACTORY, POLICE INVESTIGATION UNDERWAY Saam tv
महाराष्ट्र

Shocking : साताऱ्यात भयंकर घडलं! आगीच्या भट्टीत कामगाराने उडी मारली, धक्कादायक कारण समोर

Satara Wai Sucide News : साताऱ्यातील वाई एमआयडीसी परिसरातील एका औद्योगिक कंपनीत कार्यरत असलेल्या परप्रांतीय कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • साताऱ्यात भयंकर घडलं

  • वाई एमआयडीसीतील कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराची आत्महत्या

  • मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

  • पोलीस तपास सुरु

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील वाईमध्ये MIDC परिसरातील एका औद्योगिक कंपनीत कार्यरत असलेल्या परप्रांतीय कामगाराने आत्महत्या केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. दुर्गा रोधा प्रधान असे मृत कामगाराचे नाव असून ते मूळ झारखंडमधील राजाबासामध्ये राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा प्रधान हे काही काळापासून वाईच्या एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. या मानसिक तणावातूनच त्यांनी आगीच्या भट्टीत उडी घेऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर कंपनी परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे. घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत्यूमागील नेमके कारण, त्यांची मानसिक अवस्था तसेच इतर कोणतेही कारण या घटनेशी संबंधित आहे का, याचा शोध घेतला जात आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT