voting begins for nagarpanchayat election 
महाराष्ट्र

सातारा, सांगली, दापाेलीसह, सिंधूदूर्गात शांततेत मतदान सुरु

नगरपंचायत निवडणुकीत काेण बाजी मारणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.

ओंकार कदम, अमोल कलये, अनंत पाताडे, विजय पाटील

सातारा : सातारा, सांगली, सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या मतदानास आज (मंगळवार) सकाळपासून प्रारंभ झालेला आहे. कुडाळ (काेकण) येथील नगरपंचायतीसाठी १४ क्रमांक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने तेथील मतदान ४५ मिनीट उशिरा सुरु झाले. voting begins for nagarpanchayat election

दापोलीत शांततेत मतदान सुरु

रत्नागिरी : दापोली (dapoli) नगरपंचायतीची यंदाची निवडणुक माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या गटात हाेत आहे. ही निवडणूक दाेन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून पालकमंत्री अनिल परब यांनी पर्यावरण मंत्री रामदासकदम समर्थकांचे पत्ते कट केले. त्याठिकाणी माजी आमदार सूर्यकांत दळवी समर्थकांची वर्णी लावली. त्यामुळे निवडणूक प्रचारा दरम्यान वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. एका बाजूला शिवसेना तर दुसर्‍या बाजूला माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम , आमदार योगेश कदम समर्थक अशी रंगत पाहायला मिळाली शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने आरोप-प्रत्यारोपमुळे प्रचार हाय होल्टेज झाला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर टीका होणे अपेक्षित असताना सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हाय होल्टेज प्रचाराचा धुरळा उडाला. दापोली नगरपंचायत १५ केंद्रांवर मतदान (voting) सुरु झाले आहे. एकूण १३ प्रभागासाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

कुडाळात ईव्हीएम मशीन पडले बंद

सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात चार नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झालीय देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी ४० उमेदवार, वैभववाडी वाभवेसाठी ३७ , कुडाळ नगरपंचायतसाठी ४१ तर कसई दोडामार्गसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना, कॉग्रेस राष्टवादी, मनसे अशी लढत पाहायला मिळतंय. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे कोणता उमेदवार बाजी मारणार आहे याकडे सर्वांचे लक्ष रहाणार आहे. कुडाळ (kudal) येथील नगरपंचायतीसाठी १४ क्रमांक मतदान केंद्रावर ईव्हीएम (evm) मशीनमध्ये बिघाड झाल्याने तेथील मतदान ४५ मिनीट उशिरा सुरु झाले.

सकाळी साडे नऊ पर्यंत झालेले मतदान

वैभववाडी 16.84 टक्के

दोडामार्ग 15

देवगड 13

कुडाळ 13 .51

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी मतदान सुरु

सातारा (satara) जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. या निवडणुकीसाठी ११३ मतदान केंद्र असून २६६ उमेदवारांचे नशीब आजमावत आहेत. साताऱ्यातील लोणंद, खंडाळा, पाटण, कोरेगाव, दहिवडी आणि वडूज या नगरपंचायतीत ७८ जागांसाठी मतदान सुरु आहे.

सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीसाठी मतदान सुरु

सांगली (sangli) जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीसाठी आज मतदान सुरु झालेले आहे. कवठेमंकाळ, कडेगाव आणि खानापूर तालुक्‍यातील नगरपंचायतीच्या ३९ जागांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण २१ हजार ८४३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.       कडेगाव आणि खानापूर येथे तिरंगी तर कवठेमंकाळ येथे दुरंगी लढत होत आहे. कवठे महांकाळमध्ये (कै.) आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (rohit patil) यांच्या विरोधात सर्व पक्ष अशी लढत आहे. कडेगावात मंत्री विश्वजित कदम आणि भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

सकाळी साडे नऊ पर्यंत झालेले मतदान

कवठेमहांकाळ १४.०२ टक्के

कडेगाव १२.३७ टक्के

खानापूर १७.५८ टक्के

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constitution Of India: भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये या महिलांनी दिलंय विशेष योगदान; वाचा

Dhule News : कचरा संकलन करणाऱ्या गाडीने बालकास चिरडले; धुळे शहरातील धक्कादायक घटना

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार नाही, भाजप आमदार आक्रमक

Maharashtra News Live Updates: दिलीप वळसे पाटील देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Makeup Tips: मेकअप ब्रशचे किती प्रकार असतात? जाणून घ्या, ते कसे वापरायचे

SCROLL FOR NEXT