Man- Khatav Assembly Politics News:  Saamtv
महाराष्ट्र

Satara Politics: 'मॅचफिक्सिंग, नुरा कुस्ती चालणार नाही, वस्ताद योग्य उमेदवार देणार,' खासदार धैर्यशील मोहितेंचा जयकुमार गोरेंना टोला

Man- Khatav Assembly Politics News: माण तालुक्यात नुरा कुस्ती चालणार नाही आणि मॅच फिक्सिंगही चालणार नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

ओंकार कदम| सातारा, ता. २३ जुलै २०२४

'राजकारणातील वस्तादांचे वस्ताद फक्त शरद पवार आहेत, माण तालुक्यात यापुढे नुरा कुस्ती चालणार नाही, वस्ताद शरद पवार योग्य उमेदवार देणार असे म्हणत माढा लोकसभेचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

साताऱ्यातील माण तालुक्यात असणाऱ्या वरकुटे मलवडी येथे शरद पवार यांचे निकटवर्तीय अभय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय जंगी कुस्त्यांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, प्रभाकर देशमुख आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवरुन महत्वाचे विधान केले. राजकारणातील वस्तादांचे वस्ताद हे फक्त शरद पवार आहेत. माण तालुक्यात जनतेने ठरवलं आहे. यापुढे माण तालुक्यात नुरा कुस्ती चालणार नाही आणि मॅच फिक्सिंगही चालणार नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच निश्चित रहा, राजकारणाचे वस्ताद आपल्याला माण- खटाव तालुक्यासाठी योग्य उमेदवार देणार' असा विश्वास यावेळी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे. दरम्यान, माण- खटाव विधानसभेसाठी एकीकडे प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असताना अभय जगताप यांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्याने आगामी काळात तिकीट वाटपावरुन डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

SCROLL FOR NEXT