Satara News, Satara Police  saam tv
महाराष्ट्र

Satara News : पाेलिस- जनता संबंध दृढ करण्यासाठी एसपी समीर शेख यांचा नवा उपक्रम; संवाद तक्रारादाराशी उद्यापासून

Siddharth Latkar

Satara Police News : नागरिकांच्या तक्रारींचे योग्य वेळेत निराकरण व्हावे, पोलिस व जनता संबंध सुधारावेत, या उद्देशाने सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख (superintendent of police sameer shaikh) यांनी ‘संवाद तक्रारदारांशी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. याचा प्रारंभ सहा जुलैपासून हाेणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षक कार्यालयात हा उपक्रम राबविला जाणार आहे. (Maharashtra News)

जिल्ह्यातील नागरिकांच्या पोलिस ठाण्याशी संबंधित विविध प्रकारच्या समस्या असतात. काहींकडून त्रास होत असतो. याबाबत नागरिक तक्रार अर्ज करत असतात; परंतु पोलिस ठाण्यांमध्ये त्याची योग्य दखल न घेतल्यास नागरिकांना पोलिस अधीक्षकांकडे दाद मागण्यासाठी जिल्हास्तरावर येण्याचा त्रास घ्यावा लागतो.

तक्रारींचा योग्य निपटारा न झाल्यास नागरिकांच्या मनातील पोलिसांची प्रतिमाही मलिन होते. हे टाळून पोलिस व जनतेतील संबंध चांगले व्हावेत, तसेच तक्रारीवर मार्ग निघावा, नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविल्या जाव्यात, यासाठी श्री. शेख (satara police) यांनी नवीन उपक्रम सुरू केला आहे.

जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, कऱ्हाड, फलटण, पाटण, वडूज या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या कार्यालयात यासाठी नागरिकांना वेळ दिला जाणार आहे. यावेळी संबंधित उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारीही उपस्थित राहतील.

गुरुवारपासून (ता. ६) या उपक्रमाला सुरुवात होईल. दर पंधरवड्याला महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी संवाद तक्ररदारांशी हा उपक्रम सकाळी दहा ते एक या वेळेत होणार आहे. त्या नागरिकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण झाले नसेल त्यांनी आपल्या हद्दीतील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात या उपक्रमात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT