satara crime news, wai saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News : कुख्यात गुंडांना संपविण्याचा झाला प्रयत्न, न्यायालय परिसर हादरला; सातारा पाेलिस दल सतर्क

वाई न्यायालय परिसरातून दाेघांना पाेलिसांनी घेतलं ताब्यात.

ओंकार कदम

Wai News : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आज (साेमवार) दाेन युवकांवर गाेळीबार झाला. वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. (Maharashtra News)

कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (राहणार- भुईंज) आणि निखिल माेरे व अभिजीत शिवाजी मोरे (राहणार- गंगापुरी, वाई) यांच्यावर आज वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाला.

या तिघांना मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून नुकतीच अटक केली हाेती.

त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली हाेती. आज त्यांच्यावर न्यायालय परिसरात गाेळीबार झाला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. प्राथमिक माहितीनूसार गाेळीबार केल्याप्रकणी पाेलिसांना दाेघांना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतीला फटका; बळीराजा चिंतेत

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT