satara police arrests ktm gang along with gold and silver ornaments saam tv
महाराष्ट्र

Satara: आंतरराज्य टोळी जेरबंद; २७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस,एक किलो सोन्यासह पाच किलो चांदी हस्तगत

राज्यभरातील पोलीस ३ वर्षापासुन या टाेळीच्या मागावर हाेते.

संभाजी थोरात

Satara News :

घरफोडी करुन धुम स्टाॅईलने फरार होत संपुर्ण राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या के.टी.एम गॅंगला सातारा पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची विक्रमी मानली जात आहे. समाज माध्यमातून देखील सातारा पाेलीस दलाचे अभिनंदन हाेऊ लागले आहे. (Maharashtra News)

सातारा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सुधीर पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या टोळीकडून एक किलो सोने आणि पाच किलो चांदी हस्तगत करण्यात आली आहे. या गॅंगने राज्यातील पोलीसांसमोर जणू एक आव्हानच निर्माण केले होते. परंतु सातारा पाेलीसांनी संशयितांना कानून के हात लंबे हाेते है दाखवून दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची ही विक्रमी कामगिरी आहे. राज्यभरातील पोलीसांना ३ वर्षापासुन हवी असलेली आंतरराज्यीय के. टी. एम. गँग अखेर जेरबंद झाली आहे.

त्यांचेकडुन २७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. एकूण ६७ लाख १९ हजार ८० रुपये किमतीचे १०३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याबराेबरच 2 लाख 85 हजार रुपये किमतीच्या दुचाकी, लाेखंडी कटावणी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT