Shivaji Maharaj Statue Collapse Saam TV
महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपी चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Satish Daud

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करणाऱ्या चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई केली आहे. आता चेतन पाटील याची कसून चौकशी केली जाणार आहे.

त्यामुळे चौकशीत आणखी काय गोष्टी समोर येतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना चेतन पाटील याने चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन केलं होतं. पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एफआरआर दाखल केला. याशिवाय पुतळा तयार करणाऱ्या जयदीप आपटे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, चेतन पाटील याने सर्व आरोप फेटाळून लावले होते. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं. संपूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं, असं चेतन पाटीलने स्पष्ट केलं होतं.

पोलिसांनी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र, सातारा पोलिसांनी आज शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आरोपी चेतन पाटील याला ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आहे.

यासाठी त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा निवासस्थानी विशेष बैठक घेतली होती.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिल्पकार विनय वाघ आणि शशिकांत वडके यांची मते देखील जाणून घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी ज्येष्ठ शिल्पकार डॉ. अनिल राम सुतार यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सुतार त्यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. यासोबतच अजूनही काही मूर्तिकारांची ते भेट घेणार असून त्यांचीही याबाबतची मते ते जाणून घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

SCROLL FOR NEXT