Satara Saam
महाराष्ट्र

Satara Crime : 'दादा' म्हणायची, त्याला प्रपोजही केलं, महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात आरोपी बनकरच्या बहिणीचा धक्कादायक दावा

Satara Phaltan New Twist in Doctor Case: साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर. प्रशांत बनकरच्या बहिणीकडून धक्कादायक खुलासे.

Bhagyashree Kamble

  • फलटण येथील डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती.

  • प्रशांत बनकरच्या बहिणीनं दिली धक्कादायक माहिती.

  • आरोपीकडून फरार पोलीस गोपाल बदनेचा शोध सुरू.

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात नवनवीन अप़डेट समोर येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर तरूणीने तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. यात तिनं पोलीस उपनिरीक्षक गोपल बदने आणि प्रशांत बनकरविरोधात गंभीर आरोप केले आहेत. सध्या पीएसआय गोपाल बनकर फरार असून, पोलिसांनी प्रशांतला पहाटे पुण्यातील मित्राच्या फार्महाऊसवरून ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून प्रशांतची चौकशी सुरू आहे. दरम्यान, बनकर कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात प्रशांत बनकरच्या बहिणीनीने डॉक्टर तरूणीबाबत नवीन खुलासे केले आहेत.

डॉक्टर तरूणीनेच प्रशांतला प्रपोज केलं होतं. मात्र, भावाने नकार दिला होता, असा खुलासा प्रशांतच्या बहिणीनं केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरूणी बनकर कुटुंबाच्या घरात राहत होती. ती पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. प्रशांत बनकरच्या बहिणीनं साम टिव्ही प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार, 'डॉक्टर तरूणी वर्षभरापूर्वी आमच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहायला आली. आमच्यात चांगलं नातं होतं.'

'मी त्यांना दीदी आणि डॉक्टर तरूणी आम्हा भावंडांना दीदी - दादा म्हणायची. माझ्या भावाची आणि तिची जास्त ओळख नव्हती. माझा दादा (प्रशांत बनकर) पुण्यात असतो. मागच्या महिन्याता भावाला डेंग्यू झाला होता. डॉक्टर तरूणीनेच त्याला ट्रिटमेंट दिली. त्यावेळेस दोघांचे कॉन्टेक्ट झालं. माझा भाऊ नंतर पुण्याला गेला. तेव्हा डॉक्टर तरूणीनं भावाला प्रपोज केलं. तेव्हा माझ्या भावाने नकार दिला', अशी माहिती बनकरच्या बहिणीनं दिली.

'माझ्या घरात दिवाळी फराळ करण्यासाठी डॉक्टर तरूणीने मदत केली होती. सर्वांसोबत फोटो काढला. तेव्हा माझ्या भावाने तिच्यासोबत फोटो काढला नाही. तेव्हा डॉक्टर तरूणी भडकली. तेव्हा मी त्यांना डिस्टर्ब आहात का? असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून मेंटली डिस्टर्ब असल्याचं जाणवलं. मी त्यांना एके दिवशी जॉब करताय, चांगलं आहे, असं म्हणाले. तेव्हा डॉक्टर तरूणीने कामात खूप स्ट्रेस आहे, मेंटली टॉर्चर केलं जातं, असं सांगितलं', अशी माहिती प्रशांत बनकरच्या बहिणीनं दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: तुला पुण्याला सोडतो... सोलापूर महामार्गावर लिफ्टच्या बहाण्याने तरूणीवर बलात्कार, महाराष्ट्र हादरला!

Child Migraine: तुमच्या मुलांचं वारंवार डोकं दुखतंय अन् भूक कमी लागतेय? या आजाराची असू शकतात कारणे

Bhandara Rain : भंडाऱ्यात पावसाने झोडपले; धानाला कोंब फुटण्याची भीती

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Doctor Warns: शरीरात दिसणारे हे 5 सामान्य बदल असू शकतात ब्लड कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

SCROLL FOR NEXT