SP Tushar Doshi Confirms Link Between Doctor and Accused Saam
महाराष्ट्र

'प्रशांत अन् डॉक्टर तरूणीचे संबंध' Whatsapp Chatsमधून पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती

SP Tushar Doshi Confirms Link Between Doctor and Accused: पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टिव्ही

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं. गुरूवारी हॉटेलमध्ये आयुष्याचा दोर कापला. या प्रकरणी डॉक्टर तरूणीनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरूणीने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आरोपानुसार, पोलिसांनी प्रशांत बनकरला पहाटे पुण्यातील फार्महाऊसवरून ताब्यात घेतलं. आरोपी प्रशांत बनकरला ताब्यात घेतल्यानंतर सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी साम टिव्हीच्या प्रतिनिधींना महत्वाची माहिती दिली आहे. पीडित डॉक्टर तरूणी आणि प्रशांत बनकर या दोघांमध्ये संबंध होते, अशी माहिती तुषार दोशी यांनी दिली. 'तपासानंतर प्रशांत बनकरला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. डॉक्टर तरूणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहिती पोलीस तपासातून निष्पन्न झाली आहे', अशी माहिती तुषार दोशी यांनी दिली.

'पीडित डॉक्टर तरूणी आणि प्रशांत बनकर यांच्यात संबंध होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. चॅटिंगमधून बनकर आणि डॉक्टर तरूणी यांच्यात संबंध होते हे निष्पन्न झालं आहे', अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली. 'या प्रकरणी पीएसआय गोपाल बदने यांचा काय सहभाग आहे? पीडित डॉक्टर तरूणी आणि पीएसआयचे काय संबंध होते का? याचा तपास सुरू आहे', अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली.

'डॉक्टर तरूणीचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाला आहे, हे शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे', अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली. 'प्रशांत घर मालक आहेत. बनकर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, तो पुण्यात राहत होता. तर, डॉक्टर तरूणी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती', अशीही माहिती त्यांनी दिली. 'हॉटेलचे डिव्हिआर जप्त केला आहे. गुरूवारी २३ तारखेला हॉटेलची रूम बुक केली होती. दरवाजा उघडला नाही, म्हणून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला', अशी देखील माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Four Rajyog On 2026: पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच बनणार 4 राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब रातोरात चमकणार

Maharashtra Live News Update: नामांकनासाठी आज शेवटचा दिवस, रॅलीसह शक्ती प्रदर्शनाची तयारी

Local Body Election : अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का, गोगावलेंनी रायगडचे राजकारण फिरवले

Blood cancer: ब्लड कॅन्सर झाला की शरीरात होऊ लागतात हे बदल

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT