Female Doctor Alleges Assault Before Death Saam
महाराष्ट्र

आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? टोकाचं पाऊल उचलण्यामागचं धक्कादायक कारण समोर

Female Doctor Alleges Assault Before Death: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली. दरम्यान, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करीत होती?

Bhagyashree Kamble

  • महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली.

  • सुसाईड नोटमधून दोन जणांवर आरोप.

  • सातारा पोलिसांकडून तपास सुरू.

ऐन दिवाळीत साताऱ्यातील फलटणमध्ये धक्कादायक घटना घडली. उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. हॉटेलमध्ये गळफास लावून आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने तळहातावर सुसाईड नोट लिहिली. नंतर आयुष्याचा दोर कापला. यात महिला डॉक्टरने दोन जणांची नावे लिहिली. पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि प्रशांत बनकरविरोधात महिला डॉक्टरने शारीरिक अन् मानिसक छळाचा आरोप केला आहे.

दरम्यान, आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. फलटण येथील नामांकित हॉटेलमध्ये त्यांनी आयुष्य संपवलं असल्याची माहिती आहे. मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती.

'माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आहे. या व्यक्तीनं माझ्यावर ४ वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर या व्यक्तीनं ४ महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला', असं महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये नमुद केलं. ही दोन नावे समोर येताच सातारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत बनकरला ताब्यात घेतलं आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्याप फरार आहे. त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याचं समोर आलं.

दरम्यान, पोलिसांकडून पोलीस बदनेचा शोध सुरू आहे. तसेच मृत्यूपूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये नेमकं काय करत होती? या प्रश्नाचं उत्तर देखील सातारा पोलिसांना शोधावे लागणार आहे. या प्रकरणी पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी सांगितले की, 'महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Drink: रिकाम्या पोटी प्या हे 3 Morning Drinks, काही तासात होईल Blood Sugar कंट्रोल

Facebook: फेसबूक अकाउंट सुरक्षित ठेवायचं कसं? 'असं' करा प्रोफाइल लॉक

Maharashtra Live News Update: अकोल्यात तब्बल 2 तास मुसळधार पाऊस

Satara News: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील 'त्या' खासदार आणि पीएवर कारवाई व्हावी; भाजप आमदाराची मागणी

Phaltan Name History: फलटण शहराला नाव कसं पडलं? जाणून घ्या शिवकालीन जुना इतिहास

SCROLL FOR NEXT