Milk Price Saam tv
महाराष्ट्र

Milk Price : दूध दर भाववाढीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक; मुंबईला जाणारे दुधाचे टँकर अडवले

Satara News : शासनाने दुधाचे भाव कमी केल्यामुळे याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या गाईचे दर २६ ते २७ रुपये प्रति लिटर असून ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा

ओंकार कदम

सातारा : दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलन राज्यात सुरूच आहे. यानंतर ठाकरे गटाची शिवसेना देखील (Satara) आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. या दरम्यान ठाकरे गटाच्या शिवसेनेने (Shiv Sena) पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने निघालेले दुधाचे टँकर अडवून आंदोलन केले.  (Maharashtra News)

शासनाने दूध दरवाढीचा (Milk Price) निर्णय लवकर घ्यावा; या मागणीसाठी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाडे फाट्याजवळ महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारे दुधाचे टँकर अडवून ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाने दुधाचे भाव कमी केल्यामुळे याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या गाईचे दर २६ ते २७ रुपये प्रति लिटर असून ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारचा केला निषेध 

चाऱ्याचे दर वाढल्यांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना खर्च परवडत नाही. यात आता दुधाचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे दुधाचे दर वाढवावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा यावेळी ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule Husband: अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नवरा कोण?

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गूढ वाढलं, पोलिसांनंतर आता खासदारासह पीएवर गंभीर आरोप; भावाचा खुलासा

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आशा वर्करवर ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ

Nashik Crime : संतापजनक; रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत गैरवर्तन, रात्री परतताना चालकाचे कृत्य

"RSS रजिस्टर आहे का?" सुजात आंबेडकरांचा थेट सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT