Satara News update  Saam tv
महाराष्ट्र

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Satara News update : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट हाती आलीये. पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने खळबळ

डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिली आरोपींची नावे

आरोपी पीएसआय गोपाल बदने निलंबित

दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात

सागर आव्हाड, साम टीव्ही

साताऱ्यात डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पीडित डॉक्टर महिलेने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेवर अत्याचाराचे गंभीर आरोप केलेत. डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर दोन आरोपींची नावे लिहिली. या प्रकारानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेला निलंबित केलं आहे. विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याविषयी माहिती दिली.

विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी म्हटलं की, फलटणमध्ये जी घटना घडली. त्याबाबत पोलिस उपनिरीक्षक बदनेला निलंबित करण्यात आलं आहे. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी पथक रवाना झाले आहेत. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉक्टर महिलेने हातावर शेवटचा संदेश लिहिला. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे'.

'डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात दोन आरोपी आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथक तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यात दोन नावे समाविष्ट असून एक पीएसआय आहे'. त्याच्या निलंबनाचा आदेश निर्गमित केला आहे. आता फरार आरोपींना टीम शोधायला गेली आहे, असे ते म्हणाले.

'या प्रकरणात जे पुरावे आहेत. ते घेऊन तपास करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल. ते सर्व तक्रारी नोट करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांकडून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या नातेवाईकांकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. नातेवाईकांना आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याची माहिती दिली होती. तिने स्वतःला त्रास होत असल्याचंही नातेवाईकांना सांगितलं होतं.दिवाळीला डॉक्टर महिला स्वतःच्या घरी येणार होती. मात्र नातेवाईकांना तिच्या आत्महत्येची बातमी समजली.आता या प्रकरणात नातेवाईकांकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : भरधाव कारनं ४-५ दुचाकींना उडवलं, ट्रॅफिक हवालदार, २ वकिलांसह ५ जखमी, CCTV मध्ये अपघाताचा थरार कैद

Maharashtra Live News Update: रायगडमधअये भरधाव कारने चार ते पाच दुचाकीस्वारांना दिली धडक

Chikhaldara Tourism : चिखलदऱ्याला जा अन् काश्मीरचा फिल घ्या, पाहा निसर्गरम्य ठिकाणांची यादी

Shocking : रक्तरंजित थरार! मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजप नेत्याची निर्घृण हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Walking Benefits: जर तुम्ही दररोज ३० मिनिटे इंटरवल वॉकिंग केले तर काय होईल?

SCROLL FOR NEXT