Udayanraje Bhosale Saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : लोकसभेच्या उमेदवारीसाठी जे प्रयत्न करताय, ते माझ्यासाठीच; खासदार उदयनराजे भोसले यांचा मिश्किल टोला

Satara News : जेव्हा जेव्हा मी माझे विचार मांडले. त्यावेळी मी घराचा आहेर देतोय असं सांगितले गेले. भाजपच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी जे प्रयत्न करतायेत जे इच्छा व्यक्त करतात,

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये भाजपासाठी जे लोकसभेची मागणी करतायेत ते माझ्यासाठीच प्रयत्न करत आहेत; असा मिश्किल टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी लगावला आहे. यामुळे थेट लोकसभेच्या उमेदवारीसाठी साताराचा (Satara) उमेदवार म्हणून मीच असे संकेत त्यांनी दिले आहेत. (Live Marathi News)

साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार भोसले हे वक्तव्य केले आहे. खासदार उदयनराजे यांनी उमेदवारीबाबत भाष्य करत मागील लोकसभेवेळी मला लोकांनी राजकीय आत्महत्या करताय असं सांगितले होतं. अवघ्या तीन महिन्यात मी लोकसभेचा राजीनामा दिला. राजीनामा देणे म्हणजे तोंडचे काम नव्हते. कोणी निवडून आलेला सरपंच पदाचा राजीनामा देखील देताना विचार करतो. मात्र मी ज्या घराण्याचे नाव सांगतो त्या घराण्याचा विचारांशी मी बांधील आहे आणि तत्त्व आणि विचार महत्त्वाचे मानतो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीचे विचार पटत नव्हते, म्हणूनच मी भाजपमध्ये (BJP) आलो. जेव्हा जेव्हा मी माझे विचार मांडले. त्यावेळी मी घराचा आहेर देतोय असं सांगितले गेले. भाजपच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी जे प्रयत्न करतायेत जे इच्छा व्यक्त करतात, ते केवळ माझ्याच उमेदवारीसाठी करत आहेत; असा मिश्किल टोला देऊन अखेर लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत भाजपच्या केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या समोरच दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT