Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara News: माणमध्ये बंदला हिंसक वळण; गोंदवलेत बस फोडली, दहिवडी आगारातून सुटणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द

ओंकार कदम

सातारा : मराठा आरक्षणाला हिंसक वळण मिळाले आहे. अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाल्याने बसफेऱ्या (Satara) रद्द करण्यात आल्या आहेत. यात रात्री मुक्कामी असलेली बस फोडल्याचा प्रकार गोंदवले गावात घडला आहे. यामुळे सातारच्या दहिवडी आगारातून सकाळपासून (St Bus) बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. रास्ता रोको, तोडफोड, टायर जाळली जात आहेत. शिवार रस्त्यावरून जाणाऱ्या बसचे देखील नुकसान केले जात आहे. या दरम्यान नाशिक ते गोंदवले बस रात्री साडेबारा वाजता मुक्कामी असताना (Maratha Aarkshan) गोंदवले बुद्रुक येथे अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. बसच्या पुढील व मागील काचा फोडल्याने बसचे नुकसान झाले आहे. याबाबत डेपो मॅनेजर विक्रम हांडे यांनी माहिती दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्री साडेबाराला दगडफेक 

गोंदवले बुद्रुक येथे सिन्नर डेपोची बस नाशिक (Nashik) गोंदवले ही बस मुक्कामी होती. सोमवारी रात्री साडेबारा वाजता अज्ञात लोकांनी बसवर दगडफेक करून पुढील व मागील काचा फोडल्या. याबाबत रात्री लगेच दहिवडी पोलिस ठाण्यात फोन केल्यावर लगेच पोलिस गाडी घटनास्थळी दाखल झाली. देवस्थान ट्रस्ट येथे विश्राम करत असलेले चालक व वाहक याना उठवण्यात आले. त्यानंतर बस दहिवडी डेपोमध्ये आणण्यात आली. घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT