Father and Son Death After taking ayurvedic kadha phaltan city Shocking incident  Saam TV
महाराष्ट्र

Satara News: जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला, काही तासांतच बाप-लेकांचा मृत्यू, खळबळजनक घटना!

Father and Son Death Due To Ayurvedic Kadha: रात्री जेवण केल्यानंतर वडिलांसह मुलांनी आयुर्वेदिक काढा घेतला. त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वडील आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.

ओंकार कदम

Satara Shocking News: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर वडिलांसह मुलांनी आयुर्वेदिक काढा घेतला. त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वडील आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

हणमंतराव रामभाऊ पोतेकर (वय ५५ वर्ष) आणि अमित पोतेकर (वय ३२ वर्ष) अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. मुलगी श्रद्धा पोतेकर हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समोर येणार आहे.

याबाबत माहिती अशी, फलटण (Satara News) शहरात राहणाऱ्या हनुमंतराव पोतेकर, त्यांची पत्नी, मुलगा अमित व मुलगी श्रद्धा यांनी शनिवारी रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर हनुमंतराव, अमित व श्रद्धा यांनी आयुर्वेदिक काढा प्राशन केला. काढा प्यायल्यानंतर हे सर्वजण झोपी गेले. मात्र, मध्यरात्री या तिघांना त्रास होऊ लागला.

यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास वडील हनुमंतराव व मुलगा अमित यांचा अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलगी श्रद्धा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या घटनेमुळे पोतेकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आ

आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर त्रास होऊन बाप-लेकांचा (Shocking News) मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. जेवणानंतर घेतलेल्या काढ्यामुळे मृत्यू झाला का? अशी चर्चा परिसरात होती. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. बाप-लेकांच्या मृत्यमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

SCROLL FOR NEXT