Neera Canal Saam tv
महाराष्ट्र

Neera Canal : धक्कादायक! पाणी पुरवठा करणाऱ्या नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या; रामराजे नाईक निंबाळकरांच्या स्टेट्सने प्रकार उघड

Satara News : नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू झाले असल्याने कालवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. याचाच फायदा घेत अज्ञात इसमाने शेकडो मृत कोंबड्या कालव्याच्या पाण्यामध्ये टाकून दिल्या

ओंकार कदम

सातारा : दुष्काळी पट्ट्यातील गावांची तहान भागवणाऱ्या निरा उजव्या कालव्यामध्ये खंडाळा तालुक्यातील पिंपरी गावाच्या हद्दीत शेकडो मृत कोंबड्या वाहत असणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी आपल्या स्टेटसला ठेवून नागरिकांनी सावधगिरी बाळगा असा सल्ला दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

मागील आठ दिवसापासून नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू झाले असल्याने कालवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. याचाच फायदा घेत अज्ञात इसमाने शेकडो मृत कोंबड्या कालव्याच्या पाण्यामध्ये टाकून दिल्या आहेत. या कालव्यातील पाणी खंडाळा, फलटण, माळशिरस व सांगोला या तालुक्यातील लाखो नागरिक व फलटण व लोणंद सारख्या मोठ्या शहरातील नागरीक या कालव्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. 

व्हिडीओ पाहून नागरिकांमध्ये भीती 

लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्यात अशा प्रकारे मृत कोंबड्या कोणी व कोणत्या गावातून टाकल्या? याचा प्रशासनाने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्यात मृत कोंबड्या पडलेला व्हिडिओ पाहून या भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

पशुसंवर्धन विभागाकडून तपास सुरु 

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हाट्सअप स्टेटस मुळे प्रशासन आणि नागरिक अलर्ट मोडवर आले आहे. यानंतर प्रशासन कामाला लागले असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या घटनेची दखल घेतली असून नेमक्या कोंबड्या कशामुळे मृत झाल्या आणि त्या कालव्यात कशा आल्या याबाबत तपास सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

Pakistan Blast: इमारतीत भीषण स्फोट; पाकिस्तान हादरलं! ९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

Viral Video: शूज लपवण्यात मेव्हणीचा मास्टरस्ट्रोक; नवऱ्याचे शूज अशा ठिकाणी लपवले की शोधूनही सापडणार नाहीत!

Maharashtra Live News Update : . नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

SCROLL FOR NEXT