Satara Pusesavali News Saamtv
महाराष्ट्र

Satara Pusesavali News: साताऱ्यातील पुसेसावळी हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई, २३ जणांना अटक

Satara Pusesavali Dispute Update: समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी

Satara Pusesavali Dispute: सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार घडला. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेकही झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील खटाव तालुक्यात (Khatav) असणाऱ्या पुसेसावळी (Pusesawali) शहरात रविवारी (10, सप्टेंबर) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही गट आमने- सामने येत दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले.

या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनाकडून तातडीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी आता सोशल मीडियावर (Social Media Post) पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या २३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जाळपोळ, खून, तोडफोड,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान,जीवे मरणाचा प्रयत्न आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरण असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरात अद्याप तणावाची परिस्थिती असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

SCROLL FOR NEXT