Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

Shruti Vilas Kadam

चेहरा वारंवार धुवू नका

दिवसभरातून अनेक वेळा चेहरा धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होण्याची शक्यता असते.ृ

Skin Care | Saam Tv

मेकअप करून झोपू नका

दिवसभर चेहऱ्यावर असलेला मेकअप रात्री झोपण्यापूर्वी व्यवस्थित काढणे गरजेचे आहे. मेकअप न काढता झोपल्यास त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात.

Face care | Saam tv

सनस्क्रीन विसरू नका

घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या त्वचेला योग्य SPF असलेले सनस्क्रीन वापरा.

Skin Care | Pintrest

त्वचेला सतत हात लावणे टाळा

वारंवार चेहऱ्याला हात लावल्याने हातावरील धूळ आणि बॅक्टेरिया त्वचेवर जाऊ शकतात. त्यामुळे विशेषतः पिंपल्स असतील तर चेहऱ्याला हात लावणे टाळा.

Skin care | Saam tv

एक्सफोलिएशनचा अतिरेक करू नका

मृत त्वचा काढण्यासाठी एक्सफोलिएशन उपयुक्त ठरू शकते; मात्र वारंवार स्क्रब केल्याने त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.

Skin Care | Saam TV

त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने निवडा

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याला फायदेशीर ठरणारे उत्पादन आपल्या त्वचेलाही योग्य असेलच असे नाही. त्वचेच्या प्रकारानुसार स्किनकेअर उत्पादने निवडा.

Skin Care | Saam Tv

मॉइश्चरायझर वापरणे टाळू नका

त्वचा तेलकट असली तरी मॉइश्चरायझरची गरज असते. त्वचेला योग्य हायड्रेशन मिळण्यासाठी आपल्या त्वचेच्या प्रकाराला अनुरूप मॉइश्चरायझर वापरणे महत्त्वाचे आहे.

Skin Care

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Sugar Free Modak | Saam Tv
येथे क्लिक करा