Satara : तीन दिवसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आयकर च्या कारवाईचा निषेध!
Satara : तीन दिवसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आयकर च्या कारवाईचा निषेध! ओंकार कदम
महाराष्ट्र

Satara : तीन दिवसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आयकर च्या कारवाईचा निषेध!

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला मानला जातो. स्वतः पवार कुटुंबियांना या जिल्ह्याबद्दल आत्मीयता आहे, हे जिल्हावासीयांनी वेळोवेळी पाहिले आहे. मागच्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उदघाटन, भूमिपूजन आणि नवीन निधी वाटपाचा धडका लावला होता. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी ला मानणारा गट मोठ्या प्रमाणात आहे. कोरेगाव तालुका हा राष्ट्रवादी पक्षाचे हेविवेट नेते आ.शशिकांत शिंदे यांचा मतदार संघात गत विधानसभेला शशिकांत शिंदेंचा धक्कादायक प्रभाव झाल्या नंतर सुद्धा त्यांना विधानपरिषदेवर घेऊन पक्षाने राजकीय पुनर्वसन केले.

हे देखील पहा :

मात्र, आयकर विभागाकडून पवार कुटुंबियांच्या घरावर सुरु असलेल्या धाडींच्या निषेधार्थ आज तीन दिवसांनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केंद्राकडून होत असलेल्या अन्यायाची जाणीव झाल्याचे पाहायला मिळाले! अखेर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव मध्ये रस्त्यावर उतरून आयकर विभागाच्या कारवाईचा निषेध केला.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे 1 लोकसभा सदस्य (खासदार), 3 विधानसभा सदस्य (आमदार) आणि 1 विधानपरिषद सदस्य अशी संख्या आहे. असे असताना देखील सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्यावर आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय व्यक्तींच्या संस्थांवर तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाडी टाकल्या असून त्यामध्ये कागदपत्रांची कसून तपासणी सुरू होती. या बाबत अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अन्याय होत असल्याने राष्ट्रवादी चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. परंतू, राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्यातून मात्र काहीच हालचाल झाली नव्हती. आज अखेर तिसऱ्या दिवशी कोरेगाव मध्ये काढलेल्या मोर्च्या नंतर साताऱ्यातील राष्ट्रवादी ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अन्याय झाला असल्याची जाणीव झाली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Today's Marathi News Live : कुस्तीत आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं असेल तर मॅपमध्ये खेळावं लागेल; शरद पवार

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

SCROLL FOR NEXT