Satara Police Crime Saam TV
महाराष्ट्र

Satara: पोलीस दलाला काळिंमा फासणारी घटना; महाविद्यालयीन तरुणीची पोलिसाकडून छेडछाड

पोलिस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या एका पोलिसांने महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेडछाड करत पोलिस दलाला काळिंबा फासण्याचं काम केलं आहे.

संभाजी थोरात

सातारा: एखाद्या विद्यार्थीनीला, महिलांना कोणी त्रास देत असेल तर त्यांना जिथे न्याय मिळेल आणि जिथे सुरक्षिततेची हमी मिळेल असं हक्काचे ठिकाण म्हणजे पोलिस (Police) ठाणे आणि ती व्यक्ती म्हणजे पोलिस.

मात्र, याच पोलिस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या एका पोलिसांने महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेडछाड करत पोलिस दलाला काळिंमा फासण्याचं काम केलं आहे. याबाबत आरोपी पोलिसावर याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात (Karad City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा (Satara) जिल्ह्यात सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी एक खळबळजनक घटना घडली. सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढण्याच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मगदूम असं गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT