Gram Panchayat Election Result 2022 Saam TV
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result 2022: सत्ता आली पण सरपंचपदाचा उमेदवारच पडला; राष्ट्रवादीकडून शिंदे गटाला धक्का

ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे गटाची सत्ता आली मात्र त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून आतापर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. साताऱ्यातील कराडमधून धक्कादायक निकाल हाती आले आहेत. येथील ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे गटाची सत्ता आली मात्र त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat) सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा झाला आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा पराभव झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे प्राथामिक कल हाती आले असून जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत भाजपा आणि शिंदे गटाला धुळ चारली आहे.

दुसरीकडे, चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून १० जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी गटाला ३ जागांवर समाधान तर सरपंचपदी देवदत्त माने हे निवडून आले आहेत.

कोल्हापुरातही शिंदे गटाचा उमेदवार पराभूत

कोल्हापूर दक्षिणमध्येही असाच काहीसा निकाल पाहायला मिळाला आहे. येथील वडकशिवाले ग्रामपंचायत निवडणूकीत विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे यांचा एक मताने पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे जयवत शिंदे 1 मताने विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे यांचा एका मताने पराभव करून शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT