Satara doctor case : Saam tv
महाराष्ट्र

Satara News : डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातील आरोपी बदने आणि बनकरचा एकमेकांशी संबंध काय? कोर्टात काय युक्तिवाद झाला?

Satara doctor case : साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात दोन्ही आरोपींचा संबंध काय आहे, असा सवाल कोर्टात उपस्थित करण्यात आलाय.

ओंकार कदम

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात कोर्टातील सुनावणीदरम्यान नवे खुलासे

आरोपी बदने आणि बनकर यांच्या संबंधांचा तपास सुरु

आरोपींच्या वकिलांकडून कोठडी नाकारण्याची मागणी

कॉल डिटेल्सचे विश्लेषण आणि डिजिटल पुरावे तपासण्यासाठी पोलीस तपास सुरू

सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. डॉक्टर महिलेने दोन्ही आरोपींनी नेमका काय त्रास दिला, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. महाराष्ट्र हादरवून सोडवणाऱ्या या प्रकरणाच्या सुनावणीला देखील कोर्टात प्राधान्य दिलं जात आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींचा एकमेकांशी संबंध काय असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

साताऱ्याच्या फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील सुनावणीत सरकारी वकील क्षमा बांधल यांनी भूमिका मांडली. तर आरोपींच्या बाजूने सुनील भोंगळ यांनी बाजू मांडली. या प्रकरणाच्या सुनावणीत सरकारी वकील क्षमा बांधल म्हणाल्या की, 'सदर आरोपीने शारीरिक मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केलेलं आहे. आरोपीने सलग चार महिने मानसिक आणि शारीरिक छळ केला. कागदपत्र आणि डिजिटल पुरावे गोळा करायचे बाकी आहेत'.

'कॉल डिटेल्स मिळालेले आहेत. मात्र त्याचं विश्लेषण बाकी आहे. छळ नेमका कुठे आणि कशाप्रकारे केला याचा देखील तपास करायचा आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का? दोन्ही आरोपींचा काही संबंध आहे का? याचा तपास करायचा आहे यासाठी पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

आरोपींचे वकील सुनील भोंगळ यांनी म्हटलं की, 'मागच्या वेळी कोठडी मागताना जी कारणे दिली होती. त्याच कारण देऊन पुन्हा कोठडी मागितली जात आहे. कॉल डिटेल्स विश्लेषण करण्यासाठी आरोपीची गरज नाही. पुन्हा त्याच त्याच मुद्द्यांवर कोठडी देणे योग्य नाही. त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Blocked : समृद्धी महामार्ग रोखला, टायर पेटवले अन्...; नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक, कडूंचा गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

Criminal Encounter : आतापर्यंतचा सर्वात मोठा एन्काउंटर, ६४ गुन्हेगारांचा खात्मा, स्पेशल फोर्सची मोठी कारवाई

November Travel: नोव्हेंबरमध्ये ट्रॅव्हल प्लॅन करताय? फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत 'या' सुंदर रोमँटिक ठिकाणी करा ट्रिप

दोन आलिशान वाहनांची एकमेकांना टक्कर, बिझनेसमॅन, पत्नी अन् मुलीचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT