Satara Bank Election Saam Tv
महाराष्ट्र

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उदयसिंह यांची निवड

Satara Bank Election Update: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला मित्रपक्षांनी जोरदार धक्का दिला. ध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उदयसिंह उंडाळकर यांची निवड झाली.

Priya More

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. सातार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उदयसिंह उंडाळकर यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून दीपक चव्हाण यांची निवड झाली आहे. भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचा काटा काढला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडीनंतर जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयकुमार गोरे यांची नाराजी स्पष्टपणे माध्यमांसमोर पाहायला मिळाली. जयकुमार गोरे यांनी सांगितले की, 'अध्यक्ष हा महायुतीचा झालेला आहे. उदयसिंह उंडाळकर यांना चेअरमन म्हणून माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बँक चालावी अशी माझी अपेक्षा आहे. ही निवड होत असताना नाराजीचा विषय येत नाही ज्यांचं बहुमत आहे त्यांचा अध्यक्ष झालेला आहे.'

जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष निवडीबाबत सूचक विधान केले याची आता चर्चा होऊ लागली आहे. ते म्हणाले की, 'कोणी कशाचा वाचपा काढला हा आजचा विषय नाही जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळी होती. त्यात आम्ही वेगळे लढलो होतो ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढलो होतो आणि महायुती म्हणून जिल्हा बँकेमध्ये आम्ही एकत्र आहोत. बाकी सगळ्या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड आहेत त्या संदर्भात अधिक बोलणं उचित नाही. कोणतीही निवडणूक अंतिम नसते आगे आगे देखो होता है क्या. फॉर्मुल्याच्या चर्चेमध्ये मी आजपर्यंत कधीही नव्हतो महायुतीच्या चर्चेमध्ये मी कधीही नव्हतो. महायुतीच्या चर्चेमध्ये आदरणीय शिवेंद्र राजे होते त्यांचा काय फॉर्मुला ठरला आहे हे शिवेंद्रराजेंनाच माहीत असेल ना महायुतीने मला मतदान केलंय त्यामुळे काही विषय येत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Body Marks : दुखापत झाली नाही तरी शरीरावर दिसतात निळे डाग? सावधान! असू शकतात 'या' गंभीर आजारांचे संकेत

Washing machine shoe cleaning: घाणेरडे-मळलेले शूज वॉशिंग मशीनमध्ये कसे धुवाल? ही आहे योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या भेटीला

Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्र्यांसह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Tiles Cleaning Tips: फक्त १० रुपयांत टाईल्स स्वच्छ कशा करायच्या? सोपी आहे ट्रिक

SCROLL FOR NEXT