shivendrasinhraje bhosale
shivendrasinhraje bhosale 
महाराष्ट्र

आजही शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली 'ती' खात्री

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी हाेतील याची मला खात्री आहे असा विश्वास बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी येथे व्यक्त केला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आज (रविवार) पार पडत आहे. यामध्ये सातारा (Satara) शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ही मतदान प्रक्रिया सुरु आहे आहे. अत्यंत चुरशीची असणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदान केंद्रावर सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी भेट दिली. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी माध्यमांशी संवाद साधत सहकार पॅनल विजयी हाेईल असा विश्वास व्यक्त केला.

या निवडणुकीत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सातारा मतदार संघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची आहे. सहकार पॅनल मधील सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान जावळी तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरु असताना उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे समर्थक आणि उमेदवार ज्ञानदेव रांजणे समर्थक यांच्यात वादावादी झाली. कराड येथे मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. तेथे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने काॅंग्रेसच्या उमदेवाराशी लढत चांगली हाेईल असा अंदाज बांधला जात आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

Jharkhand ED Raid News | झारखंडमध्ये ED ची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

SCROLL FOR NEXT