आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे मराठा बांधव आक्रमक झाला असतानाच धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडीत धनगर आरक्षणासाठी चार तरुण उपोषणाला बसलेले होते. या चारही तरुणांची समजूत काढण्यात गोपीचंद पडळकर यांना यश आले. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व पडळकर यांच्या उपस्थितीत या तरुणांनी उपोषण मागे घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दहिवडीमध्ये चार तरुण उपोषणाला बसलेले होते. आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केल्या मात्र हे तरुण आपल्या भूमिकेवर ठाम होते. पालकमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
तसेच सोमवारपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल धनगर समाजाने दिला होता. त्यानंतर हालचाली गतिमान झाल्या व रात्री सव्वा नऊ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे उपोषणस्थळी दाखल झाले.
त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. सातारा जिल्हा स्तरावरील विष गणेशोत्सवानंतर स्वतंत्र बैठक घेऊन मार्गी लावण्यात येतील. राज्यभर मेंढपाळांवर जाणीवपूर्वक हल्ले होत असतील, तर संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. चार राज्यात कसे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले, त्याचा अभ्यास करणाऱ्या समितीत धनगर समाजाच्या दोन प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
तसेच संबंधित समितीच्या कामाचा पाठपुरावा करून त्याची माहिती वेळोवेळी देण्याची जबाबदारी माझी असेल. मी यासंबंधी सरकारचा प्रतिनिधी म्हणून लेखी देतो असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी मान्यवरांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आंदोलन सोडले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.