Satara News Saam TV
महाराष्ट्र

Satara News: रस्त्याच्या कडेला आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; थरारक घटनेनं नागरिकांमध्ये खळबळ

Satara Crime News: हा प्रकार सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना निदर्शनास आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Ruchika Jadhav

ओंकार कदम

Satara Crime:

सातारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजवाडा परिसरात एका व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत जळालेला मृतदेह सापडलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोपाळ विजयकुमार लकिरे असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. प्रतापगंज पेठ येथे हा व्यक्ती राहात होता. हा प्रकार सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना निदर्शनास आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित परिसराची पाहणी केली. संबंधित व्यक्ती नगर वाचनालयाच्या शेजारी शेकोटी केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे शाहूपुरी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT