shekhar sinh
shekhar sinh saam tv
महाराष्ट्र

Shekhar Sinh: यांनी सातारकरांना केले कळकळीचे आवाहन

Siddharth Latkar

सातारा : ज्या नागरिकांनी अद्याप काेविड १९ प्रतिबंधक लसीकरण (covid19 vaccination) केलेले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी केले आहे. राज्यात काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या दाेन दिवसांत सातारा (satara) जिल्ह्यात देखील काेविड १९ चे रुग्ण वाढू लागले आहेत. सध्या सहा ओमिक्रॉनचे (omicron) रुग्ण आहेत असे सिंह यांनी नमूद केले. (satara collector shekhar sinh appeals citizens to follow covid19 guideliness latest news)

जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) म्हणाले नागरिकांनी याेग्य पद्धतीने मास्क (mask) वापरले पाहिजेत. चेहरा आणि नाक झाकले गेले पाहिजे अशा प्रकारे मास्क वापरा. फॅन्सी मास्क वापरणे टाळा. ओमिक्रॉनचा संसर्ग पसरण्याचा वेग जादा आहे. एका कुटुंबातील व्यक्तीस काेराेनाची बाधा झाली तर सर्वांनाच बाधा हाेतेय हे समजून घ्या.

ज्यांचे लसीकरण (corona vaccination) झालेले नाही त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग हाेण्याचा जास्त धाेका आहे असेही जिल्हाधिकारी सिंह यांनी नमूद केले. त्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे. ज्यांनी लसीचा दूसरा डाेस घेतलेला नाही त्यांनी तातडीने घ्यावा. जिल्ह्यात दीड लाख मुले आहेत. त्यांचे लसीकरण करणार आहाेत आपण. आत्तापर्यंत २५ हजार मुलांचे लसीकरण झालेले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांत आम्ही लसीकरणाची माेहिम राबविणार आहाेत. १८ ते ४४ वयाेटातील ज्यांना लस घेतलेले नाही. तेच नागरिक जगभरात आयसीयूत असल्याचा दाखला जिल्हाधिकारी सिंह यांनी दिला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Today's Marathi News Live : मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT