Satara Cop Caught While Taking Bribe Saam tv
महाराष्ट्र

Satara Bribe Case: दोन दिवसांपूर्वी फौजदार झाला, अन् लाच घेताना पकडला

दोन दिवसांपूर्वी फौजदार झाला, अन् लाच घेताना पकडला

साम टिव्ही ब्युरो

>> नवनीत तापडिया

Cop Caught While Taking Bribe: दोन दिवसांपूर्वी फौजदार पदी पदोन्नती मिळालेले शहरातील सातारा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. या लाचखोर फौजदाराला कौटुंबिक वादातून दाखल विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी 24 हजारांची लाज घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं आहे.

मच्छिंद्र बाबुराव ससाने, असे या फौजदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात बुधवारी दिवसभर पुष्पगुच्छ स्वीकारले त्याच पोलीस ठाण्यात या फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तर दुसऱ्या घटनेत सिडको पोलीस ठाण्यातील फौजदार यांनी मालमत्तेविषयी दाखल तक्रार अर्जात गुन्हा न दाखल करण्यासाठी आणि दाखल केल्यास आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजारांची लाच मागितली तर तडजोडीअंती 12 हजार रुपयात व्यवहार ठरला. या प्रकरणातही या फौजदाराला लाच (Bribe) रुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. नितीन दशरथ मोरे, असे या फौजदाराचे नाव आहे. (Latest Marathi News)

रेशनकार्डसाठी हजार रुपयांची लाच

दरम्यान, नंदूरबारमध्ये नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी हजार रुपयांची लाच स्विकारतांना खाजगी लेखनीकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु. येथील तक्रारदाराने नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी अर्ज व कागदपत्र बनविले होते. यावेळी खाजगी इसम वसीम पिंजारी याने माझी तहसील कार्यालयात ओळख असून मी रेशनकार्ड (Ration Card) बनवुन देतो. यासाठी त्याने हजार रुपये लाचेची मागणी केली. वसीम पिंजारी याने स्वतःसाठी ७०० रुपये व संगणक चालक विशाल घुगे याच्यासाठी ३०० रुपये अशी एकुण हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी नंदुरबार तहसिल कार्यालय आवारात हजार रुपयांची लाच घेतांना वसीम बशीर पिंजारी (रा.नंदुरबार) यास रंगेहाथ पकडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT