Satara Breaking News Dhom Dam Left Canel Burst in Wai Sugarcane Cutters Were rescued Saamtv
महाराष्ट्र

Satara Dhom Dam News: गाढ झोपेत असतानाच संकट ओढावलं! वाईत धोम धरणाचा कालवा फुटला; ऊस तोड कामगारांचे संसार उघड्यावर

Dhom Dam Burst: वाई तालुक्यातील ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटल्याने संपूर्ण गावामध्ये पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. घटनेनंतर जवळपास १५० ऊसतोड मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे.

Gangappa Pujari

ओंकार कदम, सातारा| ता. १६ डिसेंबर २०२३

Satara Breaking News:

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात शनिवारी (१६, डिसेंबर) पहाटे मोठी घटना घडली. वाई तालुक्यातील ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटल्याने संपूर्ण गावामध्ये पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. घटनेनंतर जवळपास १५० ऊसतोड मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र त्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाई तालुक्यातील (Wai) धोम धरणाचा (Dhom Dam) डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे.

घटनेनंतर रातोरात जवळपास १५० ऊसतोड मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मजूरांचे संसारउपयोगी साहित्य वाहून गेले आहे. तसेच १२ बैलांना वाचवण्यात यश आले असून २ बैल पुरामध्ये वाहून गेलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार वाजता वाजल्यापासून ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT