Satara Accident News Saam TV
महाराष्ट्र

Satara Accident News: २० ते २५ प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल; भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू

Accident News: पसरणी घाटात बसचा ब्रेक फेल होऊन अपघात, अपाघातामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

ओंकार कदम

Pasarni Ghat: अपघाताची मालिका थांबता थांबत नाहीये. सातारा येथून देखील अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आलीये. पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यानं बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पसरणी घाटात अवघड वळणावर बस असताना अचानक ब्रेक फेल झाल्यानं बस घाटात मागच्या दिशेला गेली. यावेळी पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकी स्वाराच्या अंगावर आली. त्यामुळे दुचाकीवरील एका महिलेसह अन्य २ जण बसखाली आले. यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला.

बस चालकाने ही बस नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने याच बसखाली दुचाकी आल्यानं प्रिती बोधे यांचा यात मृत्यू झाला. तसेच बस कठड्याला अडकली अन्यथा आणखी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती. या बसमध्ये 20 ते 25 जण प्रवास करत होते अशी माहिती आहे. पोलिसांकडून पंचनामा झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gram Panchayat Fund: किती निधी आला? कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार

Soft Chapati: तीन पदरी घडीची चपाती कशी करायची? मऊ-लुसलुशीत टम्म चपात्यांसाठी खास टिप्स

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ठाणे जिल्ह्यातील बडा नेता अजित पवारांच्या गळाला

Maharashtra Live News Update : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

Face Care: नॅचरल ग्लोईंग चेहरा हवा असेल; मग रोज रात्री 'या' आइस क्यूबने चेहऱ्याचा मसाज नक्की करा

SCROLL FOR NEXT