Satara; 2 हजार 280 शाळांची आज वाजणार घंटा Saam Tv
महाराष्ट्र

Satara; 2 हजार 280 शाळांची आज वाजणार घंटा

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे शहरासह ग्रामीण भागामधील शाळा आजपासून सुरू होणार आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे शहरासह ग्रामीण भागामधील शाळा School आजपासून सुरू होणार आहेत. यामुळे, तब्बल दीड वर्षानंतर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी परत गजबजणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता सातारा जिल्हा परिषद Zilla Parishad आणि ग्रामस्तरावर कार्यरत ग्रामशिक्षण समितींनी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

जिल्ह्यातील ५ ते १२ पर्यंतच्या २ हजार २८० शाळांची घंटा आजपासून वाजणार आहे. कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे, मागील दीड वर्षापासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणातून धडे गिरवित आहेत. त्यामुळे, शाळांचे निकाल देखील आधीच्या वर्गातील निकालाद्वारे लावण्यात आले आहेत. १० वी आणि १२ वी परीक्षांचे निकाल ९ वी आणि ११ वीच्या गुणांवर आधारित देण्यात आले आहे.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेबर महिन्यात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र, यंदा जानेवारी नंतर कोरोनाने परत डोके वर काढल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता ऑगस्ट महिन्यापासून कोरोना हळूहळू आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यानुसार राज्य सरकारने गावपातळीवर सर्वे करून शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, ही तर संघर्षाची सुरुवात!’; शिवाजी पार्कातून उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

फक्त प्रेमच नाही, महिलांना नवऱ्याकडून हव्या असतात 'या' 5 गोष्टी

Kalu Waterfall News : मुसळधार पावसात काळू धबधब्यावर दुर्घटना; दोन ट्रेकर्सचा मृत्यू

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान आधी 'या' बड्या मंत्र्यालाही द्यावा लागला होता राजीनामा; त्यावेळी नक्की काय घडलं होतं?

Maharashtra News Live Update: अंध भक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT