Sambhajiraje Chhatrapati And Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Sarthi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जातीने लक्ष घालून सारथीचं काम केलं; संभाजीराजेंकडून कौतुक

महाराष्ट्रातील सारथीचे पहिले विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : महाराष्ट्रातील सारथीचे पहिले विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये (Nashik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati ) भोसले हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केलं.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना संभाजीराजे म्हणाले, मध्यंतरीच्या काळात सारथी (Sarthi) डळमळीत झाल्यामुळे आम्हाला पहिल्यांदा आंदोलन करावं लागलं. पण आज या सरकारच कौतुक करण्यासाठी इथे आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालून सारथीच काम केलं त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो.

पाहा व्हिडीओ -

मराठा (Maratha) समाजाच्या मागण्यांसाठी पहिल्यांदा आणि कदाचित शेवटचं आमरण उपोषण मी केलं. आरक्षण जितकं महत्वाचं मूलभूत सुविधा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. मी आमरण उपोषणाला बसलो तेव्हा एकनाथ शिंदे मला भेटायला आले.

सारथीच्या माध्यमातून नवीन विद्यार्थी अधिकारी झाले. ही योजना ग्रामीण भागातील तलागळातल्या गरिब मराठा समाजापर्यंत कशा पोहचतील याचा मास्टर प्लॅन तयार करावा, आज कौतुकाचा सोहळा असून मला यात काय त्रुटी राहिल्या असतील त्या मी आज बोलणार नाही असं ते म्हणत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं.

दरम्यान, नाशिक विभागीय कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे. इतर जिल्ह्यातही लवकरात लवकर सारथीच कार्यालय सुरू करा आणि मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून द्या आणि मराठा समाजाला सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करून दाखवा अशी विनंती देखील संभाजीराजेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT