Latur News Saam TV
महाराष्ट्र

Latur News : सरपंचांनी स्वत:च्याच अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे उचललं टोकाचं पाऊल

Latur Crime News : महामार्गावर गेल्या दोन वर्षात 18 जणांचा अपघाती मृत्यू झालाय. तर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याआधीच महामार्गाला ठिकठिकाणी भेगा देखील पडल्या आहेत.

Ruchika Jadhav

संदिप भोसले

Latur News :

लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका सरपंचांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी थेट सरपंचाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लातूर-जहीराबाद महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे. या महामार्गावर गेल्या दोन वर्षात 18 जणांचा अपघाती मृत्यू झालाय. तर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याआधीच महामार्गाला ठिकठिकाणी भेगा देखील पडल्या आहेत.

अनेकदा महामार्गावरील पानचिंचोली, मसलगाव ,लोदगा नीटूर, या गावातील नागरिकांनी महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे आणि महामार्गावर दिशादर्शक फलक, गावाशेजारी महामार्गाला सुरक्षा जाळ्या लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन केली होती. मात्र महामार्ग प्रशासन यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

त्यामुळे संतप्त लातूरच्या लोदगा गावातील सरपंच गोमारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क स्वतःवर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. दरम्यान यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेत आत्मदहनापासून रोखल आहे. ही घटना घडल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लातूर-जहीराबाद महामार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहतुकीचे नियम पाळून देखील या महामार्गावर अनेक तरुणांचा देखील अपघाती मृत्यू झालाय. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि मोठमोठ्या भेगा आहेत. रस्याला पडलेल्या भेगा पाहता हा रस्ता कधीही खचू शकतो अशीही भीती आहे.

लातूर-नांदेड महामार्गावर मोठा अपघात

काल लातूर नांदेड महामार्गावरच्या महाळुंगरा पाटी येथे अपघाताची एक मोठी घटना घडली. कार आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. नांदेडवरून तुळजापूर येथे दर्शनासाठी जात असेलेल्या गाडीने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. भीषण अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT