Sarpanch Agitation 
महाराष्ट्र

कोरोनाचे नियम पायदळी; साताऱ्यात सरपंच परिषदेचा कंदील मोर्चा

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषद यांच्या वतीने आज (शुक्रवार) साताऱ्यात कंदील मोर्चा काढण्यात आला. आंदाेलकांनी हातात कंदील घेऊन पोवई नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महावितरणाच्या विराेधात घाेषणा देत माेर्चा काढला. (sarpanch-parishad-agitation-mahavitran-satara-news)


वीज बिल न भरल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये असणारे पथदिवे (स्ट्रीट लाईट) महावितरण विभागाने बंद केल्या आहेत. त्यामुळे गावागावात रात्रभर अंधाराचे साम्राज्य असते. पथदिवे चालू कराव्यात आणि प्रत्येक ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे वीजबिल माफ करावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा हाेता असे आंदाेलकांनी सांगितले.

यावेळी हातात कंदील घेऊन तसेच वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान जमलेल्या गर्दीमुळे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले. त्यामुळे पोलिस आणि मोर्चेकर्यांच्या मध्ये वादावादी देखील झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Bugs : गव्हासह डब्ब्यात 'या' गोष्टी मिक्स केल्यास लागणार नाहीत किडे

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT