Tapi River Saam TV
महाराष्ट्र

Sarangkheda News : तापी नदी पात्रात एकाच दिवशी 2 युवकांची आत्महत्या; थरारक घटनेनं गावकऱ्यांमध्ये खळबळ

Ruchika Jadhav

सागर निकवाडे, नंदूरबार AV

Sarangkheda Tapi River :

सारंगखेडा येथील तापी पुलावरून एकाच दिवशी दोन तरुणांनी नदी पात्रात उडी टाकत आपलं जीवन संपवलं आहे. दोन वेगवेगळ्या घटना आहेत मात्र एकाच जागेवरून या दोन तरुणांनी तापी नदी पुलावरून उडी टाकल्याने एकच खळबळ माजली आहे.

यावेळी घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनची पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती. सारंगखेडा येथील तापी पूल आता सुसाईड पॉईंट झाल्याची चर्चा रंगू लागले आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलावरूल दोन तरुणांनी उडी घेतल्याने गावात विविध चर्चा सुरू आहेत. हे दोन्ही तरुण कोण आहेत त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंगोली अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाची रेल्वे खाली उडीघेत आत्महत्या

हिंगोलीमध्ये देखील आत्महत्येची अशीच एक थरारक घटना घडली आहे. हिंगोली शहरातील हिंगोली अर्बन बँकेचे व्यवस्थापक चंद्रशेखर थोरात यांनी हिंगोलीत रेल्वे पुढे स्वतःला झोकून देत आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी हिंगोली अर्बन बँकेमध्ये ग्राहकांनी आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वतःच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र ग्राहकांच्या ठेवी व रक्कम देण्यासाठी हिंगोली बँक व्यवस्थापन असमर्थ ठरत असल्याने थोरात तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT