Saptashrungi Temple in Nashik faces controversy after 22 kg of silver reportedly goes missing. saam tv
महाराष्ट्र

सप्तश्रृंगी गडावरील मंदिरात दरोडा, मंदिरातील 22 किलो चांदी गायब

Saptashrungi Temple 22kg Silver Missing Controversy: सप्तश्रृंगी गडावरील मंदिरातील तब्बल 22 किलो चांदी गायब झालीय... ही 22 किलो चांदी कुणी लंपास केली? सप्तश्रृंगी गडावर नेमकं काय सुरु आहे? माहिती अधिकारात कोणती माहिती समोर आलीय..पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगगडावरून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. आई जगदंबेच्या गाभाऱ्यातील नक्षीकामाच्या चांदीत चक्क 22 किलो चांदीची तफावत आढळलीय..त्यामुळे गडावरील मंदिरात हा कथित दरोडा कोणी घातला असा सवाल उपस्थित केला जातोय..

मंदिरातील जुन्या नोंदींनुसार मंदिरात 406 किलो चांदी असणं अनिवार्य होतं. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष मोजणी झाली, तेव्हा केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी आढळली. म्हणजे तब्बल 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचं निदर्शनास आलं..खरतर मंदिराच्या नक्षीकामासाठी 15 सप्टेंबर 2021 वा दिवसा चांदी काढण्याचा निर्णय झाला होता... मात्र दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मूल्यमापकच्या अनुपस्थितीत चांदी उतरवल्याची तक्रार आहे...याप्रकरणात ट्रस्टच्या कारभारावर मोठा संशय व्यक्त होतोय..

दरम्यान याप्रकऱणात माहिती अधिकारातून माहिती मागवल्यावर ती माहिती नाकारल्याचाही आरोप व्यवस्थापनावर करण्यात आलाय... तर दुसरीकडे चांदीच्या अपहार प्रकरणात तक्रारदाराने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनाही तक्रार दिलीय...त्यामुळे नियमानुसार सरकारी मूल्यमापकाच्या उपस्थितीत चांदी काढण्याची प्रक्रिया होणं अपेक्षित असताना नियम धाब्यावर बसवून चांदी कुणी लंपास केली?

22 किलो चांदीचा अपहार आहे की व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.. चांदीचा आजचा बाजार भाव 1 किलोमागे 2 लाख 50 हजार आहे...अशात 22 किलो चांदी जर गायब झाली असेल तर भक्तांच्या तब्बल 58 लाखांहून अधिकच्या देणग्यांनावर डल्ला प़डलाय...

वणीचा हा गड म्हणजे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. राज्यातील अनेक कुटुंबाचं कुलदैवत आहे. त्यामुळे शक्तीपिठाच्या पावित्र्याला धक्का लावणाऱ्या या प्रकरणाचा छडा लागणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Shocking : धक्कादायक! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या; अतिरक्तस्राव झाला अन् भयंकर घडलं

Thyroid Health Tips: थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे ७ घरगुती उपाय नक्की करा

India vs Afghanistan ODI: रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT