Parbhani News Today: भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी जिल्हाध्यक्षांच्या आज नेमणुका जाहीर केल्या आहेत. (Latest Marathi News)
महाराष्ट्र राज्यातील परभणी सह 25 जिल्ह्यातील ठिकाणी नवीन जिल्हाध्यक्ष नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेते संतोष मुरकुटे यांची वर्णी लागली आहे. (Parbhani)
अलीकडेच परभणी येथे ग्रामीण आणि शहरी भागातील नेत्यांच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दुसरीकडे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांनीही जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली त्यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची देखील तयारी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.