BEed Saam
महाराष्ट्र

Beed Case: कृष्णा आंधळेकडे म्हत्त्वाचे पुरावे, त्याला पकडणं खूपच गरजेचं; संतोष देशमुखांच्या भावाचा दावा

Krishna Andhale missing Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्याला पकडणं गरजेचं असल्याचं धनंजय देशमुख म्हणालेत.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. गेल्या ९८ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर आहेत. कृष्णा बऱ्याचदा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. पण तो अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. कृष्णा आंधळे सापडणे अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे आहेत, असा दावा दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ९८ दिवस उलटले. या प्रकरणात ९ आरोपी असून, ८ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असू शकतात, अशी शक्यता धनंजय देशमुखांनी वर्तवली आहे.

धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?

'कृष्णा आंधळेकडे जास्त पुरावे असावेत. त्यामुळे तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करतो आहे. त्याच्याकडे नक्कीच ठोस पुरावे असतील. त्यामुळे कृष्णाला ताब्यात घेत त्याची चौकशी करणं गरजेचं आहे'. तसेच या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे.

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ३ महिने उलटले. या प्रकरणात सीआयडीनं दोषारोपपत्र दाखल केले. यातून अनेक बाबी उघडकीस आल्या. या प्रकरणाची आणखी चौकशी सुरू आहे. तसेच फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोधही पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT