suresh dhas Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : रश्मिका, प्राजक्ता, सपना...; अभिनेत्रींचा उल्लेख करत सुरेश धस यांचा गंभीर आरोप, रोख कुणाकडे?

Suresh Dhas Latest News : रश्मिका, प्राजक्ता, सपना यांच्या नावाचा उल्लेख करत भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुरेश धस यांच्या आरोपाने चर्चांना उधाण

विनोद जिरे

बीड : मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. संतोष देशमुख प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा लावून धरत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्राजक्ता, सपना, रश्मिका यांच्या नावाचा उल्लेख करत भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

आज शुक्रवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत त्यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी सुरेश धस म्हणाले, 'बीडमध्ये महादेव अॅपचा देखील असाच प्रकार झाला. एका व्यक्तीच्या नावावर ९ अब्ज रुपयांचा व्यवहार झाला. याची ईडी चौकशी व्हायला हवी. तेथे दोन अधिकारी होते. त्यांची नावे पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे. त्या ठिकाणी चांगले काम करणारे अधिकारी बाजूला काढले. या प्रकरणाचे धागे मलेशियापर्यंत गेले आहेत'.

आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. 'आता अनेक लोक पुढे येत आहेत. आम्ही बघत असतो. रश्मिका, प्राजक्ता, सपना यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे'.

बीडवर भाष्य करताना सुरेश धस म्हणाले, 'बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर झाले आहे. बीडजवळ कोणी जमीन घेतली ते बघा. परळी बाजार समितीने गाळे बांधले. त्याचे तीन वर्षांपासून उद्घाटन झाले नाही. ते गाळे गायराण जमिनीत उभारले आहेत. चौदाशे एकर आसपास गायरान जमीन आकाचे कार्यकर्ते तीनशे वीटभट्टी चालवत आहेत. त्या ठिकाणी एकूण सहाशे वीटभट्टी आहेत'.

'त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधले आहेत. त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले आहे. आका आता नवीन पॅटर्न वापरत आहेत. त्यांनी तो आम्हाला सांगावा. आनंद चॅरिटेबल ट्रस्टला अडीच एकर जमीन मिळाली आहे. परंतु तेथे काहीही होऊ दिले नाही. त्या मागे कोण आहे. हे पाहा, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT