Santosh Deshmukh Case Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : मला आरोप मान्य नाही, कराड बोलला; न्यायाधीशांनी फटकारलं, कोर्टात नेमकं काय घडलं?

Santosh Deshmukh Case update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष न्यायालयात वाल्मिक कराडसह अन्य आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेत...मात्र यावेळी कराड न्यायाधींशांना नेमकं काय म्हणाला? न्यायाधीशांनी कराडला काय उत्तर दिलं? धनंजय देशमुखांनी काय मागणी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अखेर कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले... कोर्टात न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला गुन्ह्याची माहिती दिली... मात्र वाल्मिकनं मध्येच आरोप मान्य नसल्याचं सांगितलं.... आणि कोर्टानं वाल्मिकला चांगलंच झापलंय... मात्र कोर्टात नेमकं काय घडलं..पाहूयात...

न्यायाधीश- हा गुन्हा कबूल आहे का?

कराड- मला आरोप मान्य नाही? मला बोलायचं आहे...

न्यायाधीश- तुम्हाला जेवढे विचारले तेवढे उत्तर द्या जास्त बोलू नको

कराड- मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवण्यात आलयं...

न्यायाधीश- मी आधीच सांगितलंय.. विचारलं तेवढं उत्तर द्या, जास्त बोलू नको

कोर्टानं कराडला झाप झाप झापलं असलं तरी आता संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी मात्र कराडला फाशी देण्याची मागणी केलीय..

दुसरीकडे विशेष सरकारी वकील उज्वल निकमांनी पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार असल्याचं स्पष्ट केलंय...

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांची चार्जशीट सादर केली होती. त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील दिले आहेत. त्यात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव आहे..

बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयाने आरोपपत्रातील आरोपांच्या पडताळणीनंतर आरोपनिश्चिती केलीय... मात्र यानंतरही क्रुरकर्मा वाल्मिक आरोप मान्य नसल्याचं सांगून बड्या बड्या बाता मारतोय.... त्यामुळे कोर्ट क्रुरकर्मा कराडला शिक्षा देऊन सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय कधी देणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

Municipal Elections Voting Live updates : पुणे महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

आजचा दिवस अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम; पंचांगानुसार कोणाला मिळणार फायदा?

Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT