Dhananjay Deshmukh Meet CM Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: गुन्हेगारांना माफी नाहीच, मुख्यमंत्र्यांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन

Dhananjay Deshmukh Meet CM Fadnavis: सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी आमदार सुरेश धस सुद्धा उपस्थित होते.

Bharat Jadhav

सरपंच देशमुख यांच्या हत्येतील सहभागी असलेल्या गुन्हेगारांना माफ केलं जाणार नाही, असं आश्वसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना दिलंय. आज दुपारी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी ह्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली जात. या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय व्यक्ती वाल्मीक कराडचा सहभाग असल्याने मुंडे यांच्यावरही विरोधकांनी टीकेची राळ उठवलीय. धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्वपक्षातील नेत्यांनी केलीय. यापार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. तर दुसऱ्याबाजुला आज दुपारी धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या मुलीसह इतर कुटुबियांनी मुख्यमंत्र्यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सुरेश धस देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वसन दिलंय. बीड प्रकरणातील सर्व आरोपींना ,सोडलं जाणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.

सीडीआरनुसार तपास करण्यात यावा, आम्हांला न्याय हवा, अशी मागणी केल्याचेही धनंजय देशमुख यांनी सांगितले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आम्ही केली. त्याचबरोबर आमच्याकडे ज्या काही गोष्टी होत्या, त्या दाखवल्या. गुन्हेगारांना माफ करणार नाही, असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं ते म्हणाले.

देशमुख हत्याप्रकरणातील गुन्हेगारांना माफ केलं जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना दिलंय. मुख्यमंत्र्यांनी कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला सोडणार नसल्याचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिल्याचंही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले. तसेच आम्ही या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या

कराड 'तेरे नाम'मधील सलमान झाला पाहिजे

गावातील एक दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला. खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. त्यात संतोष देशमुखचा गुन्हा काय होता? . संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना मोक्का लावा. आरोपींनी बिनभाड्याच्या खोलीत ठेवा अशी मागणी धस यांनी केली. या आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटू देऊ नका, त्यांची तेरे नाम चित्रपटातील सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे, असंही धस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT