Walmik Karad America Connection Saam Tv (Youtube)
महाराष्ट्र

Walmik Karad : वाल्मीक कराडचं अमेरिका कनेक्शन, कराडच्या मोबाईलमध्ये कोणतं गूढ? स्पेशल रिपोर्ट

Walmik Karad America Connection : बीड कोर्टाने वाल्मीक कराडला एसआयटी कोठडी सुनावलीये. आता त्याचं अमेरिका कनेक्शन उघड झालंय. बीडमध्ये राहणाऱ्या कराडचे अमेरिकेत कनेक्शन कसे? यावरचा रिपोर्ट

Girish Nikam

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकारणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपी वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन उघड झालंय. नेमकं काय आहे हे कनेक्शन? यातून काय खळबळजनक माहिती समोर आलीय? पाहूयात विशेष रिपोर्ट.

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं सपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालंय. अनेक जिल्ह्यांमध्ये जनआक्रोश मोर्चा निघतायेत. विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे मुंडेंचा निकटवर्तीय आणि या प्रकरणातील सुत्रधार वाल्मिक कराडचे अनेक कारनामे पुढे येतायेत. त्याची बीड ते पुण्यापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघड होत असतानाच थेट अमेरिका कनेक्शन देखील समोर आलंय. एसआयटीच्या तपासात वाल्मिक कराडच्या मोबाईलचे सीमकार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समोर आलंय. त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळणार आहे.

विशेष तपास पथकानं एसआयटीने वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त केले आहेत. यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या सिमकार्डवरुन निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोन करण्यात आले होते, असा संशय एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आहे. हे फोन का केले गेले? कोणाला करण्यात आले? त्याच्यामागील कारणं काय होती? या सर्वांचा तपास आता एसआयटी करणार आहे. मोकका लावल्यानंतर कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसआयटीकडून न्यायालयात अनेक मुद्दे मांडण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग कसा आहे ? फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय संबंध आहेत ? खून केल्यानंतर सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये 10 मिनिटं फोनवर संभाषण झालं आहे. एसआयटीच्या तपासाला आणखी वेग आला आहे. दररोज या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. कराडच्या गुन्ह्यांची एक-एक कडी जोडली जात आहे. थेट अमरिकेपर्यंत धागेदोरे असल्यानं तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येतंय ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT