Santosh Deshmukh Murder Case Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मिक कराड कचाट्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठं पाऊल

Santosh Deshmukh Case: खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील १०० शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये वाल्मीक कराडचा देखील समावेश असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा शस्त्र परवाना रद्द करून टाकला आहे.

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडविरोधात १५ गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले २००५ शस्त्र परवान्याचा पुनर्विचार करावा असा अहवाल पाठवला होता. आता वाल्मिक कराडवर कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला दणका दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधु एकत्र आले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे - मंत्री जयकुमार गोरे

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार; 'या' दिवशी आयोगाविरोधात काढणार विराट मोर्चा|VIDEO

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

SCROLL FOR NEXT