Walmik Karad Health Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad Health: वाल्मिक कराडची तब्येत बिघडली; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दुपारीच लावला होता मकोका!

Walmik Karad Health : बीड सरपंच हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. कराडवर ही कारवाई होताच त्याच्या समर्थकांनी बीड बंदची हाक दिलीय.

Bharat Jadhav

वाल्मिक कराडची तब्येत खालावली असून ईसीजीमध्ये समस्या जाणवत असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं.

न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र त्यानंतर लगेचच त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. त्याचा ताबा घेण्याची परवानगी कोर्टानं एसआयटीला दिली आहे. उद्या त्याला हत्येच्या प्रकरणात केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

मात्र त्याआधी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची बातमी समोर येताच त्याच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. कराडच्या समर्थकांनी टायर जाळून आंदोलन केलं. तसेच यावेळी आंदोलकांकडून बसवर देखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे आता परळीचं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

त्यासह मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आलाय.

सामाजिक तेढ निर्माण करणारी सोशल पोस्ट महागात पडली, बीडचा पोलीस कर्मचारी सस्पेंड

बीड आणि परळीतील वातावरण तापलं असतानाच सामाजित तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानं पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ही कारवाई केली. गोरख हाडुळे असं या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते.

कराडच्या आईंची प्रकृती बिघडली

आज सकाळपासून परळी पोलीस स्टेशनबाहेर वाल्मिक कराडच्या मातोश्री पारुबाई कराड यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. वाल्मिक कराडने सरेंडर केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. सरपंच हत्या प्रकरणातील इतर आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. पण वाल्मिक कराडवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. आज न्यायालयाने मकोका लावण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT