Santosh Deshmukh Case Update Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणाचा आणखी एक पुरावा समोर; मोकारपंती ग्रुपवर कृष्णा आंधळेचा व्हिडीओ कॉल

Beed Crime News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला नवा पुरावा समोर आला आहे. देशमुखांना मारहाण करताना कृष्णा आंधळेने व्हिडीओ कॉल केल्याचे जवाब मोकारपंती ग्रुपवरील सदस्यांनी दिला आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात व्हाट्सअ‍ॅप ग्रुप हा महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. दरम्यान हत्या प्रकरणात मोकारपंती या ग्रुपचा ॲडमिन फरार कृष्णा आंधळेच होता हे स्पष्ट झाले आहे. या ग्रुपमधील सदस्यांनी दिलेला जवाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार आहे. हा जवाब साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना कृष्णा आंधळे याने मोकारपंती या ग्रुपवर व्हाट्सअ‍ॅप कॉल केला होता. त्यावेळी कृष्णाने संतोष देशमुख यांचा चेहरा तीन वेळा व्हाट्सअ‍ॅप कॉलवर दाखवला होता. तेव्हा सरपंच यांच्या चेहऱ्यावरील जखमा होत्या. त्यातून रक्त येत होते असा जवाब मोकारपंती ग्रुपमधील चार सदस्यांनी दिला आहे.

'कृष्णा आंधळेने एका कारमध्ये निपचीत पडलेल्या अवस्थेतील एक माणूस व्हिडीओमध्ये आम्हाला दाखवला होता. त्याच्या अंगावर फक्त अंतर्वस्त्र होती. तसेच त्याच्या अंगावर मारहाणीमुळे ठिकठिकाणी वळ उठलेले व जखमा झालेल्या दिसत होत्या. कृष्णा म्हणाला, हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे, जो त्यादिवशी सुदर्शन भैय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता. त्यावेळी त्याने मोबाईल सरपंचाच्या तोंडाजवळ नेला. तेव्हा मला सरपंचाच्या चेहऱ्यावरही जखमा होऊन त्यातून रक्त आलेले दिसले' असे पोलिसांना दिलेल्या त्या जवाबामध्ये नमूद आहे.

'मला ते बघून खूप भीती वाटली. त्यामुळे मी व्हिडीओ कॉलवरच कृष्णा आंधळे (वाघ्या) याला तुम्ही सरपंचाला लय मारलं आहे. बास करा. एवढं मारु नका असे म्हणालो होतो. ज्यावेळी कृष्णाने आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला होता, त्यावेळी तेथे त्याच्यासोबत महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व प्रतिक घुले हे सुद्धा असल्याचे व्हिडीओ कॉलमध्ये मला दिसले', अशी नोंदही मोकारपंती ग्रुपमधील सदस्याच्या जवाबात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

Nandurbar Accident : धनतेरसला भयानक अपघात, सातपुड्यात भाविकांवर काळाचा घाला, ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

SCROLL FOR NEXT