Walmik Karad News Update Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case :वाल्मीक कराड लटकणार, सुदर्शन घुलेनं पोलिसांसमोर केला गौप्यस्फोट, काय काय सांगितले?

Beed Walmik karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सुदर्शन घुले अन् इतर दोन आरोपींना या प्रकरणात कबुली दिली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. आता या हत्याकांडासंदर्भातील सर्वात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली (Sudarshan Ghule's Shocking Confession) दिली आहे. त्यांनी आवादा कंपनीशी संबंधित खंडणीच्या प्रकरणाबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे, ज्यामुळे वाल्मीक कराड याची अडचण आणखी वाढल्याची चर्चा बीडमध्ये सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी काढले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटले होते. आरोपीच्या अटकेसाठी राज्यभरात आंदोलन झाली होती. फडणवीस सरकारने या प्रकरणाची दखल घेत तपास सीआयडी, एसआयटीकडे सोपवला.

सुदर्शन घुले याने पोलिसांना काय काय सांगितले ?

सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सहभाग आणि सगळा घटनाक्रम सांगितला. सुदर्शन घुले याने आधी या हत्या प्रकऱणातील सहभाग असल्याचं नाकारले. पण पोलिसांनी आवादा कंपनीच्या मॅनेजरला खंडणी मागितल्याचा व्हिडीओच दाखवला. त्यानंतर घुले पोपटासारखा बोलला.

होय, संतोष देशमुख यांचं अपहरण करूण हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना का मारले, याबाबतही पोलिसांना सांगितले. वाल्मीक कराड याने सांगितल्यानंतर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितलेय. घुले, चाटे आणि केदार यांनी गुन्हा कबूल केल्यामुळे वाल्मीक कराड पुरता आडकला आहे. त्याचे पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा बीडमध्ये सुरू झाली आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी कराड सध्या अटकेत आहे.

नेमकं पोलिसांना काय काय सांगितले -

आवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीत सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरत होते. आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यांनी त्यांच्या माणसांसोबत आम्हाला मारहाण केली. मित्राचा वाढदिवस होता, त्याच दिवशी आम्हाला मारहाण केली अन् अपमान केला. संतोष देशमुख यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ अन् फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आम्हाला चॅलेंज दिले होत. याचा आम्हाला राग आला होता. त्यामुळे अपहरण करून हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले याने पोलिसांसमोर दिली. दरम्यान, आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हिडीओ शूट केल्याची कबुली पोलिसांनी दिली. जयराम चाटे यानेही पोलिसांसमोर आरोप मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

SCROLL FOR NEXT