Santosh Deshmukh Case Saam
महाराष्ट्र

Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्याकांडाला अर्धा वर्ष झालं, तरी आरोपी फरार; कृष्णा आंधळे कुठे लपला?

Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन आज सहा महिने झाले. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या तावडीत नाही.

Bhagyashree Kamble

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज सहा महिने पूर्ण झाले. मात्र, या घटनेतील मुख्य आणि महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही मोकाट आहे. पोलिसांच्या तावडीत तो अद्याप सापडलेला नाही. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. पण व्हिडिओ शूट करणारा आरोपी आंधळे फरार आहे. तो नक्की कुठे लपला? त्याला राजकीय वरदहस्त आहे का? असा प्रश्न देशमुख कुटुंबाने उपस्थित केला आहे.

देशमुखांची हत्या करण्यात येत असताना कृष्णा आंधळेने 'मोकार पंती' ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्या क्रूर घटनेचे मोबाईलवर शूटिंग देखील केलं होतं. एवढं असूनही तो आरोपी सहा महिन्यांपासून फरार असून पोलिसांना सापडत नाही, यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणाशी संबंधित बीडच्या विशेष न्यायालयात आजपर्यंत सहा सुनावण्या पार पडल्या आहेत. या सुनावण्यांमध्ये वेगवेगळ्या अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.

आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीचा अर्ज. आरोपी विष्णू चाटेचा लातूरहून बीड कारागृहात स्थलांतराचा अर्ज, मात्र हा अर्ज नंतर मागे घेण्यात आला. वाल्मीक कराडने ‘मी निरपराध आहे’ असा दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला असून त्यावर अवादा एनर्जी प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

मात्र, या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही? हा मोठा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र कृष्णा आंधळे पोलिसांच्या तावडीत का सापडला नाही? त्याला कुणाचातरी राजकीय वरदहस्त असू शकतं का? असा प्रश्न देशमुख कुटुंबाने उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT