Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : सरपंचाच्या हत्येनंतर बदनामीचा कट? दिशाभूल करण्यासाठी पोलिसांचा 'अनैतिक' डाव? पाहा स्पेशल रिपोर्ट

Beed News : संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या बदनामीचा कट पोलिसांनीच रचल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. हा बदनामीचा कट का रचण्यात आला? आणि ऐनवेळी हा कट कुणी उधळला? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यभर गाजत असलेल्या सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. सरपंच संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं भासवण्यासाठी पोलिसांनी डाव आखला होता, असा गंभीर आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या समोरच केलाय. तर त्यासाठी एक महिला तयार ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय.

संतोष देशमुखांना हत्येनंतर पोलिसांनी त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये टाकून कळंबच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी पाठलाग केल्याने हा डाव फसल्याचं पुढं आलंय. त्यावर धनंजय देशमुखांनी प्रतिक्रीया दिलीय. तर संतोष देशमुखांना सगळ्या बाजूने संपवण्याचा डाव मारेकऱ्यांनी रचल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय.. तर गाडी कळंबला पोहचण्याआधीच संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याने पोलिसांचा डाव फसल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय.

सरपंच संतोष देशमुखांना अनैतिक संबंधात अडकवून त्यांच्या हत्येचं समर्थन घडवण्याचा कट रचणाऱ्या पोलिसांची चौकशी करुन त्यांच्यावर मकोकांतर्गत कारवाई कधी केली जाणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT